इतरेजणांनी आपणाकडे ‘तुच्छताभावी’ तिरस्कारानं बघून आपला द्वेष केला, अशी तक्रार का बरं, आणि कोणत्या तोंडानं करावी?
निवडकांचा उल्लेख, निवडकांबद्दल प्रतिक्रिया, निवडकांचा गौरव, निवडकांचा गवगवा, निवडकांनी निवडकांसाठी निवडकांमार्फत चालवावयाची निवडक अवॉर्ड-रिवार्डची सिस्टिम, याला ‘सांस्कृतिक माफियागिरी’ म्हणायचं नाही, तर दुसरं काय? ओळखीच्या वाढप्याने पंक्तीतल्या एखाद्याच्याच पात्रात हटकून पक्वान्न आग्रह करकरून वाढावीत आणि इतरांकडे ढुंकूनही पाहू नये, असला पंक्तिप्रंपच तुच्छतेस पात्र नव्हे काय?.......